विकास सावंत यांचे आवाहन;राणी पार्वतीदेवी शिक्षण संस्थेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
*सावंतवाडी ता. ०८-: शिष्यवृत्ती परीक्षेतील यश म्हणजे शैक्षणिक जीवनातील तुम्ही गाठलेला यशाचा एक टप्पा आहे. हे यश पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरक ठरेल. समाजात वावरत असताना तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी गणूक ठेवा भावी शैक्षणिक जीवनात तुम्ही यापेक्षाही यशाची उच्च शिखरे गाठा असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी केले.राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, सावंतवाडीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संस्था सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व संस्था सदस्य अमोल सावंत तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ प्रशस्तिपत्र व कै. पार्वती महादेव धारगळकर व कै महादेव लक्ष्मण धारगळकर यांचे स्मरणार्थ श्रीम. मुग्धा दिनेश नागवेकर पुरस्कृत रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण विभागातून राज्यात ११ वा तर जिल्हयात प्रथम आलेला कु. पारस प्रसाद दळवी 272 गुण, कु. सत्यम महेश पेडणेकर 200 गुण जिल्हयात २७ वा, कु. लता महेश परव (182 गुण) जिल्हयात ४३ वी, कु· हिमानी श्रीराम धोंड (176 गुण) जिल्हयात ४९ वी तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण विभागातून जिल्हयात पाचवा आलेला कु · योगेश विवेकानंद जोशी (264 गुण) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. केदार सुरेश म्हसकर यांजकडून जिल्हयात प्रथम आलेला कु पारस प्रसाद दळवी यास रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्यावतीने कु· पारस दळवी कु· लता परब व कु· योगेश जोशी तसेच शिक्षकांच्यावतीने श्रीम. आर. जी. राणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड यांनी तर आभार श्रीम. पी. पी. सावंत यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. शृंगारे यांनी केले.
