भाजपाच्या टीमवर्कमुळेच आघाडी सरकारला आम्ही पुरून उरलो:अतुल काळसेकर

किसान मोर्चा शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल

*⚡कणकवली ता..०७-:भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूकीत धनशक्तीचा नाही तर हा भाजपाच्या नेटवर्कचा विजय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो नाही तर भिडलो. आम्हाला रोखण्यासाठी आघाडी सरकारने शर्थीचे प्रयत्न केले पण आम्ही पुरून उरलो.

यामागे भाजपाचे टीमवर्क होते.असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाची निर्विवाद सत्ता स्थापन झाल्यानंतर आता भाजपाकडून जिल्हा बँकेची सत्ता अंमलबजावणी करण्याकरिता उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या किसान मोर्चाची बैठक घेत बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल असा विश्वास किसान मोर्चाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, किसान मोर्चा संयोजक उमेश सावंत आदी उपस्थित होते. श्री काळसेकर पुढे म्हणाले, बँक व किसान मोर्चा हे वेगळं नात निर्माण होऊ शकत. या बैठकीत अनेकांमुद्यावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात 1 लाख पेक्षा जास्त टन ऊस उत्पादन होते. 1700 हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली, आहे.

ऊस वाहतूक होणाऱ्या गगनबावडा घाट हा वाहतूकीस योग्य नाही. ऊस वाहतूकदार वाहतुकीस तयार नसल्याने ऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत.यामुळे नुकसान होत असल्याने उसाचा उतारा येत नाही. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांची भेट घेणार. या घाट रस्त्याला खड्डे पडले आहेत. या बाबत डी.वाय.पाटील कारखान्याशी चर्चा करण्यात येणार आहे. या प्रश्नी अन्य मार्ग काय काढता येईल,त्याची माहिती घेण्यात येणार आहे. सा. बा. ने जर रस्त्याची दुरुस्ती वेगाने केली तर मार्ग निघेल असे काळसेकर यांनी सांगितले. शेतकरी पेन्शन योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. 1 लाख 12 हजार शेतकरी किसान सन्मान निधीचे लाभार्थी असून, यातील 36 हजार जिल्हा बँकेचे लाभार्थी आहेत. शेती कर्ज जसे दिले जाते तसे थेट कर्ज शेतकऱ्यांना कसे देता येईल याची चर्चा करण्यात आली. भाजपाची राज्यात सत्ता असताना खावटी कर्जमाफीसाठी प्रयत्न केले. सिंधुदुर्गसह कोल्हापूरमध्ये पण कर्जदार वंचीत होते. या प्रश्नी नारायण राणे यांच्या मार्फत पाठपुरावा केला. नंतर या बाबत शासन निर्णय झाला. त्यावेळी 28 कोटी तरतूद करण्यात आली होती. पण ऑडिटमुळे हा विषय प्रलंबित राहिला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या कडून जनतेची अपेक्षा होती. स्वतःला शेतकरी नेते म्हणतात पण या प्रश्नी सावंत यांनी पाठपुरावा केला नाही. राणेंना श्रेय मिळेल म्हणून हा विषय राज्य सरकारने दाबून ठेवला.

त्यामुळे आता तरी सरकारने पैसे द्यावे व दिलासा द्यावा. शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने सोसायटीना कर्ज दिले जाते आतापर्यत शेतकऱ्यांना हे कर्ज मिळत आहे. पण यापुढे मच्छिमार, दुग्ध, शेळी व्यवसायिकांना पण कर्ज देत त्यांच्या फायद्यासाठी प्रयत्न करणार. गृह कर्ज 187 विकाससंस्था मार्फत वाटप करता येईल का? या बाबत पण आम्ही विचार करतोय. शासकीय कर्मचाऱ्यांना बँक आपलीशी वाटण्यासाठी प्रयत्न करणार. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारच्या योजनेवर बँकेचे व्यवहार होत होते. शून्य टक्के व्याजदर कर्ज योजनेत राज्याकडून 3 टक्के रक्कम आली नाही. पण येत्या काळात ही रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हा बँकेतील पराभव भाजपाला विचार करण्यासारखा आहे. राजन तेली हे पॅनल प्रमुख होते. त्यांनी जास्त वेळ हा इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी दिला. त्यांनी आमच्या इतर उमेदवारांचे नेतृत्व केले. त्यामुळे स्वत:च्या विजयाची काळजी ते घेऊ शकले नाहीत. मतदारांना विरोधकांनी अनेक आमिषे दाखवली. त्याचा फटका तेलीना बसला. आमदार नितेश राणे यांनी सांगितलं होत की, बँकेतील कंत्राटी कर्मचारी कायम होऊ शकतात. या बँकेचं नेतृत्व आमदार नितेश राणे हेच करतात. त्यामुळे या प्रश्नी ते निर्णय घेतील. असे अतुल काळसेकर म्हणाले.

You cannot copy content of this page