वडाचापाट येथील शांतादुर्गा देवीचा १६ पासून जत्रोत्सव

*⚡मालवण ता.०७-:* बागायत वडाचापाट येथील आदिशक्ती स्वयंभू शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव १६ ते २१जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०. वा. देवीच्या पाषाणावर जलाभिषेक, नामस्मरण, महाआरती रोज सायंकाळी ७ वा. होणार आहे.

१७ रोजी सकाळी ८ ते १२.३० वा. कलशारोहण वर्धापन दिन, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भराडी भजन मंडळ, मसदेचे भजन, रात्री ११ वा. पूजापाठ व पालखी सोहळा नंतर आईचा गोंधळ १८ रोजी सकाळी १० वा शासनातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, दुपारी २ वा. हळदीकुंकू, पाककला / विविध स्पर्धा, सायंकाळी ७ वा. नवपाटवाडी ग्रामविकास भजन मंडळ, वडाचापाटचे भजन, रात्री ९.३० वा. नृत्यस्पर्धा १९ रोजी सकाळी ८ ते १२.३० वा. विश्वकल्याणार्थ शक्तीपीठ नवदुर्गा चंडी महायाग / महाप्रसाद, सकाळी १० वा. रक्तदान जनजागृती व माहिती शिबीर, सायंकाळी ७ वा प्राथमिक शिक्षक कलामंच भजन मंडळ, कुडाळचे भजन, रात्री ८.३० वा. समाज प्रबोधनपर कीर्तन गायकवाड महाराज फोंडा, रात्री ११. वा पालखी सोहळा, चेंदवणकर-गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग. २० रोजी दुपारी ४ वा संगीत भजन स्पर्धा २१ रोजी सकाळी १० वा. शैक्षणिक उपक्रम स्पर्धा, सायंकाळी ६ वा. पूर्णानंद स्वामी भजन मंडळ, गोळवण बोरकरवाडीचे भजन, दीपोत्सव, हरिनाम संकिर्तन श्रीमद्भागवत कथाव्यास श्रीरामचंद्र दास (इस्कॉन) (प. पू. राधागोविंद गोस्वामी महाराज यांचे शिष्य), रात्री १० वा. बक्षीस वितरण, ११.०० वा. पूजापाठ व पालखी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page