दोडामार्ग महाराज हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
*⚡दोडामार्ग ता.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयातील प्रा डॉ प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्या गावठाण या कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी दोडामार्ग येथील महाराजा हॉल येथे होणार आहे.डॉ प्रज्ञाकुमार गाथाडे गेली वीस वर्षापासून दोडामार्ग येथे कार्यरत असून अनेक दैनिक,मासिक, दिवाळी अंक, व काही विशेषांकात वेगवेगळ्या विषयावर लिखाण करतात.यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे तीन पुस्तक, पश्चिम घाट संपादन, आणि बिरसा मुंडा हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.गावठाण हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह असून पुणे येथील सुगावा या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
या पुस्तकाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर महाराष्ट्रातले आजचे आघाडीचे कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी ब्लर्म लिहिला आहे .शनिवार दिनांक आठ जानेवारी 2022 रोजी कादंबरीकार बांदेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बांधा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर, प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सोमनाथ कदम उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोवा येथील प्रसिद्ध पत्रकार प्रभाकर ढगे भूषवणार आहेत.दोडामार्ग वाचन मंदिर दोडामार्ग, मुक्तद्वार वाचनालयात कळणे,युवा परिवर्तन संघर्ष संस्था दोडामार्ग, यांच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाई परमेकर,हरिचंद्र भिसे, विजय जाधव, शरद देसाई,ऍड.प्रविण नाईक यांनी केले आहे.
