पंढरीनाथ आचरेकर यांनी 39 वेळा रक्तदान करत समाजापुढे ठेवला वेगळाच आदर्श…

देवगड-प्रतिनिधी रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून ओळखले जाते रक्तदानामुळे अनेक रक्ताची नाती जोडु शकतो अशीच अनेक रक्ताची अनेक नाती जोडणारे रक्तमित्र व देवगड शेठ म.ग.हायस्कुलचे परिचर पंढरीनाथ हरी आचरेकर यांनी 39 वेळा रक्तदान करुन एक समाजासाठी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

वाडा गावचे रहिवाशी देवगड शेठ म.ग.हायस्कुल मधील परिचर पंढरीनाथ हरी आचरेकर वय 52 यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून रक्तदान करण्यास सुरुवात केली. गेल्या 22 वर्षामध्ये त्यांनी 39 वेळा रक्तदान केले आहे. वर्षातून 2 ते 3 वेळा आवर्जुन करीत आहेत. यापुढेही ते रक्तदान करीतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवरती अनेकांना रक्ताची गरज भासत होती.

अश्यावेळी त्यांनी कोरोना विषाणूच्या काळात म्हणजेच गेल्या दिड वर्षामध्ये पाचवेळा रक्तदान केले आहे. यामुळे त्यांना अनेकवेळा रक्तदान केल्यामुळे पुरस्कार देखील मिळाले आहेत. शिक्षण भारती या शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेच्या माध्यमातून त्यांना आप्पासाहेब पटवर्धन सेवा तत्प्र पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच अनेक मंडळांकडून संस्थेकडून त्यांचे वेळोवेळी सत्कारही करण्यात आले आहेत. रक्तदान केल्यामुळे मनुष्याला एक नवीन संजीवनी प्राप्त होते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून मनुष्य सुदृढ राहण्यासाठी व आजार होवू नये म्हणून रक्तदान करणे हे महत्वाचे आहे. असा संदेशही समाजामध्ये देवून स्वत रक्तदान करीत दुस-यांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करुन रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे आचरेकर यांनी सांगितले.

वाडा दशक्रोशीमधील रक्ताची गरज भासली कि,अनेक लोक आचरेकर यांना आवर्जुन संपर्क साधतात त्यांनी वेळोवेळी लोकांना रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तदान केले आहे. फोटो- पंढरीनाथ हरी आचरेकर पासपोर्ट साईज् फोटो

You cannot copy content of this page