वायंगणी येथे आयोजित करण्यात आले होते शिबीर
वेंगुर्ले
तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वायंगणी ग्रामपंचायत सभागृह येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन संपन्न झाले. वायंगणी सरपंच सुमन कामत, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, प्रादेशिक प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे डॉ. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा व काजू मोहर संरक्षण याबाबत शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी डॉ. दळवी यांनी मोहर टिकवणे, कीटकनाशकांची फवारणी करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नाला योग्य उत्तरे दिली.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोलम, ग्रामसेवक संदीप गवस, तलाठी चव्हाण, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग कृषी सहाय्यक प्रसाद खडपकर, कृषिसेवक सुरज परब, प्रगतशील शेतकरी सुनील नाईक, आंबा बागायतदार अवि दुतोंडकर, अर्जुन नाईक, गुरुप्रसाद पंडित, कृषी मित्र कावले,वायंगणी – तळेकरवाडी येथील ३६ शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार खानोली कृषी सहाय्यक लाडु जाधव यांनी मानले.
