*⚡कणकवली ता.२८-:* राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जन, सुप्त कलाचे सादरीकरण होण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राज्यामध्ये आयोजन करण्यात येते यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात.
राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये 15 ते 29 वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 30 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता . जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या युवा महोस्तवाकरीता पुढील कला प्रकार आहेत.
लोक नृत्य सहभाग कलाकार संख्या 20 व वेळ 15 मिनिटे.लोकगीत सहभाग कलाकार संख्या 10 वेळ 07 मिनिट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे शिक्षण पूर्ण झालेले ,कला अध्यापन, विद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वांसाठी हे कलामंच खुले आहे. या महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामुल्य असून प्रविण्य संपादन करणारे कलाकरांना शासनाचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपली प्रवेश निश्चिती दिनांक 28 डिसेंबर 2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रवेश अर्ज सादर करून करण्यात यावी. तरी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विजय शिंदेजिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. तरी प्रवेश अर्ज प्राप्त होताच ऑनलाइन लिंक कळविण्यात येईल.
