वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ
*⚡कणकवली ता.२६-:* वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद आहे . वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थाही गेली ४४ वर्षे सातत्यपूर्ण काम करून चालवत आहे . याचा मला अभिमान आहे . ठाकर समाजाची लोककला जतन करून ठेवण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले . या कलेचा महाराष्ट्रसह अन्य भागांमध्ये प्रचार व प्रसार केला . याची दखल केंद्र सरकारने घेऊन मला पद्यश्री पुरस्कार दिला . मला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय सिंधुदुर्गवासीयांना आहे . पिंगुळी येथे माझ्या गोठ्याच्या जागेत उभारेले म्युझियम पाहण्यासाठी व लोककलांचा अभ्यास करण्यासाठी देश – विदेशी पर्यटक आनंद लुटण्यासाठी व आभ्यास करण्यासाठी येत आहेत.याचा मला अभिमान आहे.परंतु ही लोककला जतन करण्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन करत कष्ट करावे लागलेत.मेहनत करावी लागली. त्यामुळेच ही कला टिकून राहीली असून आता ही कला जगभर पोहोचण्यासाठी मला माझा मुलगा सहकार्य करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . जिल्ह्यातील तरुणांनी पिंगुळी येथे उभारलेले म्युझियम पाहण्यासाठी यावे असे आवाहन पद्मभूषण पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांनी केले . कणकवली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा प्रतिष्ठानच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी रात्री पद्मभूषण परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी नाट्यलेखक गोविंद गोडबोले , परीक्षक प्रदीप वैद्य , चित्तरंजन गिरी , अश्विनी गिरी , संस्थेचे कार्याध्यक्ष वामन पंडित , अँड.नानू देसाई ,उमेश बाळके , लिना काळसेकर,मिलिंद बेळेकर ,राजा राजाध्यक्ष प्रसन्ना देसाई आदी मान्यवर उपिस्थत होते . यावेळी प्रदीप वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाट्यचळवळ निरंतर सुरू राहण्यासाठी आचरेकर प्रतिष्ठान जे योगदान देत आहेत. ते अतुलनीय आहे. यावेळी वामन पंडित यांनी आचरेकर प्रतिष्ठानचा ४४ वर्षांचा इतिहास रसिकांन समोर मांडून प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात कोणते उपक्रम घेतले जाणार आहेत.याची माहिती दिली.युवा पिढीलाही या संस्थेत सामील करून घेण्याचा मानस असल्याचे सांगितले.तदपूर्वी पद्यश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला . त्यानंतर मान्यवरांचे स्वागत उमेश वाळके,लिना काळसेकर,मिलिंद बेळेकर,राजा राजाध्यक्ष अँड.नानू देसाई यांनी केले . यावेळी पद्यश्री परशुराम गंगावणे यांना श्राल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह देऊन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.पहिल्या सत्रात शालेय गटांनी आपले नाटकांतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली तर आज खुल्या गटातील एकांकिका स्पर्धा पाहता येणार असून गेले 2 वर्षे या पाहता आल्या नसल्याने प्रेक्षवर्गाने देखील पहिल्याच दिवशी आनंद लुटला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वामन पंडित यांनी करत पाहुण्यांची ओळख करून दिली तर सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.
