*⚡कणकवली ता.२६-:* राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार हे सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर चिपी विमानतळ येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अबिद नाईक यांनी सिंधुदुर्गतील विविध विकास प्रश्नबाबत चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादीनेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर ,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कर्ले, माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, राष्ट्रवादी व्यापार उद्योग महिला कणकवली तालुका अध्यक्ष सौ. रिया भाबुरे ,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष उर्फ़ बाबू सावंत ,प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस सौ. नम्रता कुबल ,प्रांतिक सदस्य उदय भोसले, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर ,वेंगुर्ला माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सावंतवाड़ी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रिद्धि परब ,माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे ,राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, गणेश चौगुले, अनिस नाईक, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. रंजना निर्मल, सचिन सदडेकर, माजी आकेरी सरपंच संदीप राणे ,माजी उपसभापती आर. के. सावंत, वेंगुर्ला राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य नितिन कुबल उपस्थित होते.
