केंद्राच्या निर्णयानुसार बूस्टर डोस ची तयारी पूर्ण…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

*⚡ओरोस ता.२६-:* देशात कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय कालच पंतप्रधानानी घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्याचा निर्णय झाला असून, फिल्ड वर काम करणाऱ्या नागरिकांना देखील बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सर्व तयारी झाले आहे का, तसेच पुन्हा कठीण परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होईल का, याबाबत आज जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी ते पुढे म्हणाले की, चक्री वादळामुळे नुकसान ग्रस्त झालेल्यांना चौदाशे कोटी रुपये देणे बाकी होते. त्याची पुरवठा मागणी मध्ये त्याची तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायची होती. तो प्रश्न देखील या चौदाशे कोटी मुळे निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील विमानतळाकडे जाणारा रस्ता मंजूर झाला असून, काही किमी राहिलेल्या रस्त्याची मी मुंबईत गेल्यावर तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page