बॅ.खर्डेकर यांनी समाज घडविण्याचे काम केले – विजू गावडे

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर या महामानवाने वकिली न करता समाज कार्याला वाहून समाज प्रबोधनाकरीता आयुष्य वेचताना समाज घडविण्याचे काम केले. बॅ.खर्डेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व हते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. त्या महाविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. महाविद्यालयाने माझ्यावर संस्कार केले म्हणून मी आज उच्च पदावर आहे असल्याचे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिक्षक गोविद उर्फ विजू नरहरी गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले. बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५८वा स्मृतिदिन आज बॅ.खर्डेकर महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गावडे बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपिठावर कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, बॅ.खर्डेकर स्मृतिदिन समितीचे चेअरमन प्रा.बी.बी.जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डी.जे.शितोळे आदी उपस्थित होते. बॅ.खर्डेकर हे दातृत्वान होते. आपल्याला मिळालेली चांदी व तांब्याची पदके विकून त्यांनी परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होते. बॅ.खर्डेकर हे थोर संसदपटू होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पंडित नेहरु आवर्जून उपस्थित राहत. बॅ.खर्डेकर यांनी वेंगुर्ला येथे महाविद्यालय उभे करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचे प्राचार्य देऊलकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमात बॅ.खर्डेकर वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती सानिका मांजरेकर हिला विजू गावडे यांच्या हस्ते फिरती ढाल व पारितोषिक देऊन तसेच राजश्री परब (द्वितीय), योजना नवार (तृतीय), काजल साळगांवकर व सानिका वरसकर (उत्तेजनार्थ) यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर अपूर्वा परब, मारिया आल्मेडा, डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.विवेक चव्हाण यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. महाविद्यालयातर्फे प्राचार्य देऊलकर यांच्या हस्ते माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे विजू गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला कलावलयचे संजय पुनाळेकर, रमेश नार्वेकर, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक श्रेया मयेकर, महाविद्यालयाचे माजी कर्मचारी अरविद आळवे, भाऊ राजगे, पी.के.कुबल, डी.एस.बागायतकर, देसाई स्कूलच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, पूजा कोले, सृष्टी टिकम, सरीता हरमलकर, भारती पालव, निशा आळवे-कुबल, मिलन पडवळ, मोहिनी मयेकर, अनुजा राऊळ, येरम, राजन परब, बाळा वेंगुर्लेकर, नॅकचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे, प्रा.संजिव चमणकर, प्रा.एस.टी.भेंडवडे, सुरेंद्र चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच एन.सी.सी.कॅडेट व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा.बी.बी.जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, डॉ.आनंद बांदेकर यांनी पाहुण्यांचा परिचय, डॉ.डी.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार तर डॉ.मनिषा मुजूमदार यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page