२ जानेवारी तुळस येथे जिल्हास्तरीय दौड स्पर्धा

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६.३० वा. जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही खुला पुरुष व महिला, इ.१ली ते २री, इ.३री ते ४थी, इ.५वी ते ६वी, इ. ७वी ते ८वी , इ.९वी ते १०वी प्रत्येकी मुली व मुलगे अशा एकूण १२ गटामध्ये होणार आहे. खुल्या पुरुष गटासाठी १५००, १०००, ७०० रुपये तर खुल्या महिला गटासाठी अनुक्रमे ५५५, ४४४, ३३३ तसेच उर्वरित सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शालेय गटात सहभागी होणा-या स्पर्धकांनी ओळखपत्र किवा शाळेचे शिफारस पत्र आणणे अनिवार्य आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी महेश राऊळ व सागर सावंत यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page