बावशीतील रेशनिंग दुकान परवाना उपोषण सुरू

उपोषण स्थळी आम.नितेश राणे यांनी दिली भेट

*⚡कणकवली ता.२६-:* जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या पाठपुराव्याने मंजूर झालेले बावशी गावातील रेशनिंग दुकान बचत गटाला न देता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला असून या विरोधात आणि आपल्याला रेशनिंग दुकान परवाना मिळावा यासाठी जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून आमदार नितेश राणेंनी या उपोषणाला भेट देत महीला बचत गटाशी चर्चा केली आहे.

यावेळी भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे , गणेश तळगावकर,पप्पु पुजारी, लक्ष्मण घाडीगांवकर आदी उपस्थित होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल मल्हार स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरु करण्यात आले असून उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. यावेळी बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता सुषमा सावंत यांच्यासह अन्य महिलांनी उपोषण सुरू केले आहे. बावशी येथील जय मल्हार स्वयं सहायता महिला बचत गटामार्फत बावशी गावाला स्वतंत्र रेशनिंग दुकान मिळावे, यासाठी गेल्या वर्षी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सुपूर्द केला होता. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता नाही. तसेच इतर भागातील लोकांना दूर जावं लागणार म्हणून पुरवठा विभागाने दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते. परंतु या दोन ते तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. तसेच बचत गटाच्या महिलाही कोरोना बाधीत होत्या. यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान परवाना रद्द केला आहे. मात्र बावशी गावाला मंजूर झालेले रेशन दुकान एका पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला आहे. असे करून प्रशासन महिला बचत गटाच्या महिलांचा रोजगार काढून घेत आहे. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने प्रयत्नच्या महिला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

You cannot copy content of this page