सामाजिक बांधिलकी ग्रुपचा निराधार बेघर नागरिकांना मदतीचा आधार…

रवी जाधव आणि सहकाऱ्यांनी पाच ते सहा बेघर नागरिकांना चटई आणि ब्लॅंकेट दिली भेट

*⚡सावंतवाडी ता.२६-:* शहरात रस्त्यावर राहणाऱ्या अनाथांना सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. सद्य स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्याने हे अनाथ आणि बेघर नागरिक अक्षरशः थंडीत कुडकुडत आहेत. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी रवी जाधव यांना देताच त्यानी माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्या सोबत संपूर्ण शहरात रात्री फिरून त्यांचा शोध घेतला.

यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, प्रा. सतिश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, सेवानिवृत्त एस्टी कर्मचारी श्यामसुंदर हळदणकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या पाच ते सहा निराधार बेघर नागरिकांना एक चटई आणि एक ब्लेंकेट अशा वस्तू दिल्या आहेत. त्यानी केलेल्या या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page