पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी…
*⚡सावंतवाडी ता.२५-: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज नाताळ असल्याने तलावाकाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु , ही दुर्गंधी पाहून त्यांनी नगरपालिके विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
