करूळ, कुंभवडे चोरीचा छडा

सतीश झाझमला संशयित म्हणून ताब्यात;सावंतवाडीत झालेल्या चोरीतही होता हात

*⚡वैभववाडी ता.२५-:* तालुक्यातील करूळ आणि कुंभवडे येथील तीन मंदिरातील चोरीचा छडा लागला आहे. या मंदीरातील चोरीची कबुली संशयित आरोपी सतिश मुरलीधर झाझम (रा.तळेबाजर देवगड)याने वैभववाडी पोलीसांना दिली आहे. सावंतवाडी येथील चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या झाझम याने कबुली दिली आहे.

ज्ञमहिनाभरापुर्वी तालुक्यातील तीन मंदिरात चोरी झाली होती. कुंभवडे येथील एकविरा मंदिर,करूळ भोयडेवाडी येथील गणेश मंदिर आणि केदारलिंग मंदिरात महिनाभरापुर्वी चोरी झाली होती.रोख रक्कम आणि मंदिरातील घंटा चोरीस गेल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपुर्वी सावंतवाडी पोलीसांनी त्या भागातील मंदिर चोरी प्रकरणी तळेबाजार ता.देवगड येथील संशयित आरोपी झाझम याला ताब्यात घेतले होते.यापुर्वीच्या अनेक मंदिर चोरी प्रकरणात त्याचा सहभाग असल्यामुळे वैभववाडी पोलीसांनी झाझमला ताब्यात घेतले असता त्यांनी करूळ आणि कुंभवडे येथील तीनही मंदिरातील चोरी केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन खाडे हे करीत आहेत.

You cannot copy content of this page