संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली होती नोटीस
*⚡कणकवली ता.२५-:* शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात बजावलेल्या नोटीसीनुसार आज हजेरी लावली.या हल्लाप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी नोटीस बजावली होती.चौकशीसाठी आमदार नितेश राणे,गोट्या सावंत कणकवली पोलीस स्थानकात आज दाखल होत आपले म्हणणे मांडले आहे.
संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता आमदार नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांना कणकवली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी नोटीस बजावली होती. या नोटीस नंतर आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत पोलिसांना नोटीसीचे लेखी उत्तर दिल्याचे सांगितले होते. मात्र आज दुपारी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत हे कणकवली पोलिस स्थानकात या नोटीस च्या अनुषंगाने उपस्थित राहील्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.तब्बल पाऊण तास चौकशी सुरू होती.
