कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कारसंदीप बोडवे, ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ सिद्धेश आचरेकर
*⚡मालवण ता.२५-:* मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ जानेवारीला धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मालवण तालुका पत्रकार समितीची सभा शनिवार २५ डिसेंबर रोजी धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे समिती अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सभेस कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव परेश सावंत, मनोज चव्हाण, अमित खोत, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, उदय बापर्डेकर, नितीन आचरेकर, अनिल तोंडवळकर, सुधीर पडेलकर, संदीप बोडवे, आप्पा मालंडकर, संग्राम कासले, विशाल वाईरकर, केशव भोगले, नितीन गावडे, यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पत्रकार पुरस्कारसह प्रशासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट व लोकाभिमुख सेवा बजावत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणारे राजेश पारधी, मालवण पंचायत समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त अमित खोत आणि पोईप सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या संतोष हिवाळेकर या पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला
