देवगड बसस्थानकावर लालपरी अवतरली!आणि प्रवासी वर्गाला हायसे वाटले

*⚡देवगड ता.२४-:* रापम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपातील कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू असताना काही आगारातील प्रवासी फेऱ्या अंशतः सुरू झाल्या त्या अनुषंगाने कणकवली आगारातून कणकवली देवगड स.१० वा. प्रवासी फेरी (लालपरी)देवगड आगारात ११.३० च्या मानाने आली .

आणि प्रवासी वर्गाला हायसे वाटले त्या प्रवासी फेरी पहाताच नागरिक सुखावले. ती प्रवासी फेरी ११.४५ वा कणकवली कडे रवाना होऊन या व्यतिरिक्त अन्य एक प्रवासी फेरी दुपारी २.१५ वा .कणकवली हुन देवगड कडे येऊन साय ४ वा. देवगड हुन कणकवली कडे मार्गस्थ झाली .या दोन्ही फेऱ्या नियमित सुरू राहणार असल्याचे एस टी प्रशासनाने सांगितले.या प्रवासी फेरीची नोंद सेवेत रुजू असलेले सहा. वहातुक नियंत्रक लवू सरवदे यांनी केली .कणकवली आगारात एकूण ३ वाहक चार चालक शासन प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून रुजू झाले आहेत. त्यांचे मार्फत कणकवली देवगड व कणकवली फोंडा वैभववाडी तरळा कणकवली या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.या मार्गावर गाडी क्र. एम.एच.२०-९५९२ या प्रवासी फेरी चालक एस.आर.नर,वाहक.ए.बी जाधव यांनी सेवा बजावली.

You cannot copy content of this page