कोल्हापूर येथील अपघातात ओटवणेतील तरुणाचा मृत्यू

कागल येथे दोन टेम्पोची भीषण धडक

*⚡सावंतवाडी,ता.२४-:* कोल्हापूर-कागल येथे काल रात्री दोन टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ओटवणे येथील चंद्रकांत कृष्‍णा गावकर (५६) यांचा जागीच मृत्यू झाला. गावकर हे टेम्पो घेऊन कोल्हापूर येथून परतत असताना हा अपघात झाला.या अपघातात समोरील टेम्पो चालकाचासुद्धा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावकर हे आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन सावंतवाडीच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरोची त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघाताची भीषणता एवढी होती दोन्ही वाहनांच्या समोर विभागाचा चक्काचूर होऊन चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर एका टेम्पोतील क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. त्याला तेथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गावकर हे गेली अनेक वर्षे ट्रान्सपोर्टचे काम करत होते. दरम्यान त्यांच्या अपघाती निधनानंतर ओटवणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे.

You cannot copy content of this page