तालुका स्तरीय कथाकथन स्पर्धेत लहान गटात अस्मि मांजरेकर प्रथम…

तर मोठ्या गटात सानिका भोगणे प्रथम…

सावंतवाडी-: येथील श्रीराम वाचन मंदिर तर्फे साने गुरुजीच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कुल सावंतवाडीच्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

तर इन्सुली जि. प. शाळा नंबर 2 ची श्रुती शिवाजी पोपकर हिने द्वितीय तर मळगाव हायस्कुलच्या रेषमा आनंद शिरोडकर हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे. तर मोठ्या गटात मदर क्वीन्स सावंतवाडीच्या सानिका दत्तगुरु भोगणे हिने प्रथम, आरपीडी हायस्कुलची मनस्वी प्रवीण मांजरेकर हिने द्वितीय तर मळगाव हायस्कुल च्या भूमी एकनाथ नाटेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेचे परीक्षण प्रा. मिलिंद कासार व प्रा. पूनम वाडकर यांनी केले. ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते दत्ताराम वाडकर यांनी कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला लहान गटात तालुक्यातील 25 विध्यार्थी तर मोठ्या गटात 20 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्रीराम वाचन मंदिर चे पदाधिकारी बाळासाहेब बोर्डेकर, प्रा. सुषमा मांजरेकर, ग्रंथपाल पटेल, सौ. कानसे, परीक्षक श्री. कासार, सौ वाडकर यांच्या उपस्थितीत झाले.

You cannot copy content of this page