*⚡कणकवली ता.२३-:* असलदे मधलीवाडी येथे श्री. सत्यनारायण महापुजा व श्री. देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन सोहळा दि . २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि . २५ डिसेंबर २०२१ रोजी सायं . ४.३० वा .सत्यनारायण महापुजा,रात्रौ १० वा . स्थानिक भजने होणार आहेत.तसेच रविवार दि . २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वा . श्री माऊली देवीचा अभिषेक, दुपारी १२.३० वा . महाआरती,दुपारी १ ते ३ वा . महाप्रसाद,रात्रौ १०.३० वा . भजनाचा जंगी सामना श्री. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ , भरणी , कुडाळ बुवा- श्री . विनोद चव्हाण ( भजनसम्राट कै . चिंतामणी पांचाळ यांचे शिष्य ) पखवाज- भावेश राणे , तबला ओंकार,राहुल. विरुद्ध श्री. वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ , लिंगडाळ देवगड बुवा – श्री . संदीप लोके ( गुरुवर्य विजय परब यांचे शिष्य ) पखवाज- योगेश सामंत , तबला संदेश सुतार यांच्यात होणार आहे. तरी सर्व भाविकांची लाभ घ्यावा असे आवाहन असलदे मधलीवाडी ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
