*⚡वेंगुर्ला ता.१७-:* तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर अपघातात शहिद झालेले भारताचे पहिले सीडीएस प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी व ११ संरक्षण दलाच्या अधिका-यांना सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, होडावडा शाखेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सैनिक होडावडा शाखेचे संचालक रमाकांत नाईक, राजबा सावंत, कुंदा पै, पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक शुभदा नवार, कर्मचारी विक्रम परब, सिद्धेश रेडकर, जयराम परब, पिग्मी एजंट प्राजक्ता होडावडेकर, सरिता घोगळे, रविद्र केळुसकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. प्रारंभी बिपीन रावत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आज भारतीय सैन्याकडे जी प्रगत शस्त्र यंत्रणा आहे, त्यांचे श्रेय जनरल रावत यांना जाते. त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न येणारे देशाचे अतोनात नुकसान झाले असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सैनिक पतसंस्था होडावडा शाखेतर्फे रावत यांना श्रद्धांजली…
