*⚡कणकवली ता.१७-:* कनेडी येथून जवळच असलेल्या भिरवंडे गांधीनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील गणेश घाट रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. सरपंच मंगेश बोभाटे यांच्या हस्ते या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच महादेव सावंत, माजी सरपंच शेखर सावंत, संजय सावंत, अविनाश सावंत, सुधीर सावंत, रमेश सावंत, सूर्यकांत सावंत, सुनील बागवे, प्रकाश तेली, अभिषेक मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. भिरवंडे खलांतर मुख्य रस्त्यापासून शंभर मिटर अंतरापर्यंत जाणाऱ्या गणेश घाटापर्यंत या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रयत्नातून तसेच खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार हा निधी मंजूर झाला आहे.
