भारत गौरव यात्रेचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून संपूर्ण सिंधुदुर्गात करण्यात आले होते आयोजन…

*⚡सावंतवाडी ता.१७-:* अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात “भारत गौरव यात्रा” आयोजित करण्यात आली होती. १३ डिसेंबर २०२१ पासून विजयदुर्ग येथून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. या यात्रेचा शेवटच्या दिवशी त्याचे सावंतवाडीत आगमन झाले असून, शहर भाजपच्या वतीने या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, अजय सावंत, परिक्षित मांजरेकर, राज वरेरकर, हेमंत बांदेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page