तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मंगेश तळवणेकर यांनी दिले निवेदन..
सावंतवाडी ता.१७- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी येथे आज भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सावंतवाडी बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना मंगेश तळवणेकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संपूर्ण राज्यभर सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. शासनाला जाग येण्यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि राज्य परिवहन कामगार सेना यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन केले होते.
