एस्टी कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा मनाई आदेश…

मंगेश तळवणेकर यांचा आरोप; मंगेश तळवणेकर, राजू कासकर यांच्यासह अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

*⚡सावंतवाडी ता.१७-:* महाराष्ट्रात गेले अनेक दिवस परिवहन मंडळाचे राज्य सरकार मध्ये विलनीकरण होण्यासाठी एस्टी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मोर्चा काढला होता. परंतु, जिल्ह्यात काल संपलेला मनाई आदेश पुन्हा काल रात्री पासून, जाहीर केल्याने मंगेश तळवणेकर हे चांगलेच आक्रमक झाले.

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस्टी कर्मचाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यासाठी दबाव आणत आहेत. असा आरोप केला आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेली पगारवाढ ही चुकीची असून, त्यांनी ‘अंतरिम पगारवाढ’ चा अर्थ स्पष्ट करावा असे सांगितले आहे. यावेळी मनाई आदेश असताना देखील मोर्चा काढल्याने माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, शिर्शिंगे सरपंच रेखा घावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

You cannot copy content of this page