नगराध्यक्ष संजू परबांची भूमिका
*⚡सावंतवाडी ता.१७-:* एस्टी कर्मचाऱ्यांचा जो लढा सुरू आहे. तो योग्य असून, जो पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तो पर्यंत हा लढा सुरूच रहावा. या लढ्याला आपला शेवट पर्यंत पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे मत सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले आहे. मंगेश तळवणेकर यांनी आज एस्टी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या मोर्च्यात त्यांनी उपस्थित राहत मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
