Headlines

एन.सी.सी. कॅडेटसना ‘अग्निशमन’चे प्रशिक्षण

*⚡ओरोस ता.१७-:* : ५८ महाराष्ट्र बटालियन एन्. सी.सी. सिंधुदुर्गमार्फत सिनियर डिव्हिजन आणि सिनियर विंगच्या एनसीसी कॅडेटससाठी आयोजित कंबाईन अन्युअल ट्रेनिंग कॅम्प-३१७ मध्ये गुरुवार १६ रोजी फायर फायटिंगचे प्राथमिक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक एनसीसी कॅडेट्सना देण्यात आले.

यासाठी एम.आय. डी. सी. फायर सर्विस कुडाळ येथील सेक्शन अधिकारी जुम्मा रज्जाक् तडवी, प्रदीप राऊत व त्यांचे सहकारी यांनी आग् लागण्याचे प्रकार व वीज़वण्याच्या पद्धती सांगून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, ट्रेनिंग जे.सी.ओ. इतर पी.आय.स्टाफ, शिबिरार्थी एन. सी.सी. चे. २११ कॅडेटस उपस्थित होते. एन्.सी.सी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ. बी.एल. राठोड यांनी फायर फायटिंग सर्विसच्या अधिकाऱ्याचे स्वागत केले तर लेफ्टनंट डॉ. बी.जी गायकवाड यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page