खारेपाटण केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रभागस्तरीय स्पर्धांमध्ये यश

*⚡कणकवली ता.१७-:* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोस्तवी वर्षा निमित्त कणकवली पंचायत समितीच्या वतीने प्रभाग स्तरावर तळेरे येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची विद्द्यार्थ्यांनी कु.अनुश्री अमोल तळगावकर व अथर्व ऋषिकेश जाधव या दोन विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

प्रभाग स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत खारेपाटण केंद्र शाळेच्या इयत्ता ६ वी च्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु.अनुश्री अमोल तळगावकर हिने “स्वातंत्र्याच्या संग्रामातील एक दृश्य ” ता विषयावर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर अथर्व ऋषिकेश जाधव याने “माझ्या देशातील ऐतिहासीक व क्रांतिकारक स्थळ ” या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे.विद्यार्थ्यांनी प्रभागस्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षा सौ.गौरी शिंदे शाळेचे मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page