बेकायदेशीर रित्या दगड वाहतूक करणाऱ्या डंपरवर तहसिलदारांची कारवाई…

*⚡सावंतवाडी ता.१६-:* बेकायदेशीर रित्या दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपर वर आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कारवाई केली असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ही कारवाई आज सायंकाळी इन्सुली येथे करण्यात आली. यावेळी दगड वाहतूक करण्याचा पास संपला असताना देखील दगड वाहतूक करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page