बैलगाडी शर्यतीला न्यायालयाच्या परवानगीनंतर कणकवलीत जल्लोष

पटकीदेवी ते पटवर्धन चौकापर्यंत काढली बैलगाडी रॅली

*⚡कणकवली ता.१६-:* बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्यभरात या निर्णयाबद्दल जल्लोष साजरा करण्यात येत असताना कणकवली शहरात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कणकवली पटकी देवी मंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत बैलगाडीची रॅली काढत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे याबाबत शर्यती प्रेमि मधून नाराजी पसरली होती. आज याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कणकवली शहरातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page