*⚡कणकवली ता.१५-:* मुलाच्या शोधासाठी गेले ७ महिने व्याकूळ झालेल्या बापाची मिडिया व पोलिसांच्या मदतीने मुलाची भेट झाली .उत्तर प्रदेशातील कुशिनगर जिल्ह्यातील पडरौना गावातील २४ वर्षाचा तरुण २ मे पासून बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात पर्यंत लागल्याने वयोवृद्ध बापाने त्याला शोधण्यासाठी आपली भटकंती सुरू केली होती . गेल्या आठवड्यात अचानकपणे राधानगरीतील कारिवडे येथील राजू पाटील यांच्या दूरध्वनीवरून संदीप प्रसादचा ठावठिकाणा लागला.
संदीप हा चोवीस वर्षाचा असला तरी त्याची मानसिक स्थिती थोडीफार बिघडलेली होती त्यामुळे तो घरातून निघून गेला होता उत्तर प्रदेशातून थेट कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी त्यांनी कशी गाटली हे त्याला आठवत नाही. पण मागील आठवड्यात राधानगरी येथील कारिवडे परिसरातील एका मंदिरांमध्ये बेपत्ता असलेला संदीप हा राजू पाटील यांना सापडला. त्यांनी त्याला जेवण वगैरे दिले पण तिथेही त्यांचा डोळा चुकून तो सिंधुदुर्गाच्या दिशेने आला अशी माहिती बापाला मिळाली त्याला शोधत शोधत बाप देखील सिंधुदुर्ग येथील कणकवली फोंडा नांदगाव या ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला व कणकवली पोलिस स्टेशन गाठले .त्यांना मुलगा हरवल्याचे सांगितले यावेळी उपस्थित वृत्तपत्र व सोशल मीडिया यांनी देखील मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या बापाची दखल घेत सर्वत्र बातमी प्रसारित केली आणि या बातमीच्या माध्यमातून आज देवगड मुंनगे येथील विकास साळसकर यांनी बातमी वाचून हा मुलगा तेथे असल्याचे कणकवली पोलिस स्थानकात फोन करून सांगितले त्याची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेखर शिंदे ,वैभव कोळी यांनी बापाला सोबत घेत देवगड मुणगे गाठत बापाची मुलाची भेट घडवली व त्या दोघांना कणकवली येथे पोलिस स्थानकात आणून त्यांना जेवनाची व्यवस्था करून गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटही काढून दिले
