समीर पेळपकर यांचा विजय निश्चित असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा
*⚡बांदा ता.१५-:* बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना पुरस्कृत उमेदवार समीर पेळपकर यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत पेळपकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिवसेनेचे शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, काँग्रेसचे बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पुरस्कृत उमेदवार समीर पेळपकर यांना जाहीर देण्याचा निर्णय घेतल्याचे तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमची लढाई ही विकासासाठी असून प्रभाग क्रमांक चार मधून पेळपकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, विभागप्रमुख राजेश विरनोडकर, उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी, युवासेनाप्रमुख ज्ञानेश्वर येडवे, काँग्रेसचे विलास सावंत, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
