*⚡सावंतवाडी ता.१५– :* यंग स्टार ग्रुपच्यावतीने खुल्या प्रकाशझोतातील अंडरआर्म स्पर्धेचे आयोजन २२ व २३ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी-गरड येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम १० हजार व चषक (अब्दुल शेख, मुनाफ शेख, मुनाफ शेख यांच्याकडून पिरसाब शेख यांच्या स्मरणार्थ), द्वितीय ५ हजार (यंग स्टार पुरस्कृत) व चषक (किरण माटेकर पुरस्कृत) अशी पारितोषिके आहेत. तसेच सामनावीर, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रवेश शुल्क ७०० रुपये असून खेळाडूंनी आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९८९०५३३९४०, ९४०३५५९९८८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
