अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. पार्थ सावंत प्रथम

*⚡सावंतवाडी ता.१५-:* बालदिन निमित्त अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृर्त्व स्पर्धेमध्ये ‘चाचा नेहरू’ या विषयावर लहान गटातुन ( इयत्ता – १ ली व २ री) कै. सौ. सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर 2 चा दुसरी तील विद्यार्थी कु.पार्थ उमेश सावंत याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे यापूर्वी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आयोजित विविध स्पर्धा वक्तृत्त्व , चित्रकला स्पर्धेमध्ये ‘आई ‘ , ‘शिवाजीराजे’, ‘तिरंगा’ या विषयांवरही पार्थने प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या शिवाजी भोसले एजुवर्ल्ड आयोजित राज्यस्तरीय बोधकथाकथन स्पर्धेत पार्थने द्वितीय क्रमांक पटकावला आहे .

यापूर्वीही पार्थने अश्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केल आहे. पार्थच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खानोलकर, सर्व शिक्षक व पालक समिती ने पार्थचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या . पार्थच्या या यशासाठी वर्गशिक्षक श्री. महेश लंबे , आई- वडील डॉ.उमेश सावंत , डॉ. निर्मला उमेश सावंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

You cannot copy content of this page