उसने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला मारहाण प्रकरण चौघांना न्यायालयीन कोठडी

मालवण (प्रतिनिधी) उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून ताराचंद्र रामचंद्र चव्हाण (रा. धामापूर) यांच्यावर लोखंडीने वार करीत डोक्यास व हाताला जबर दुखापत करून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उदय सीताराम पावसकर, दादू उर्फ विशाल विलास कोरगावकर, बाबू उर्फ गणपत बाबाजी जावकर व योगेश प्रभाकर करंगुटकर (सर्व रा. काळसे बागवाडी) या चौघा आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २८ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. धामापूर येथील ताराचंद्र चव्हाण यांनी आपल्या आईच्या उपचारासाठी उदय सीताराम पावसकर याच्याकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत १३ डिसेंबरला परत करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी उदय पावसकर याला दिले होते. मात्र पैसे परत न केल्याच्या रागातून दि. १२ डिसेंबर रोजी ताराचंद्र चव्हाण यांना उदय पावसकर व त्याच्या तीन मित्रांनी काळसे येथे अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने वार करत जबर जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी ताराचंद्र चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदय पावसकर, दादू उर्फ विशाल कोरगावकर, बाबू उर्फ गणपत जावकर योगेश करंगुटकर अशा चौघांवर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चारही जणांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर हे करत आहेत.

You cannot copy content of this page