सावंतवाडी ता.११-:मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथील काझी शासुबुद्दीन हॉल येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थांच्या महाराणी शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते दिप प्रजवलनाने करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वधू वर सूचक मेळाव्याला मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचे मुले व मुली उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते महाराणी शुभदादेवी भोसले, युवराणी श्रद्धादेवी भोसले, अच्युत भोसले, प्रविण भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थांच्या युवराणी श्रद्धादेवी भोसले, मंडळाचे अध्यक्ष संजू परब, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, अँड. संतोष सावंत, मकरंद तोरसकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, विनोद सावंत, दत्ता सावंत, सत्यजित धारणकर, रमेश गावकर, भक्ती सावंत, उज्वला सावंत, पंढरी राऊळ, सौ. विजया रामाने आदी उपस्थित होते.
