*⚡कणकवली ता.११-:* रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल या संस्थेतर्फे शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था संचलित शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे विद्यार्थी व पालक यांचेसाठी मोफत आरोग्य विषयक शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. आरोग्य शिबिरास शाळेतील विध्यार्थी पालक वर्ग बहुसंख्येने हजर राहून शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिरामध्ये विद्यार्ध्याची त्वचा, दात व इतर आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. त्यांना औषधे, गोळ्या, स्किन क्रिम तसेच टॉनिकचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच पालकवर्गाचे रक्तदाब, मधुमेह व जनरल चेकअप करण्यात आले. पालकांना देखील मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास स्कूल कमिटीचे चेअरमन ॲड. राजेंद्र रावराणे, शाळेचे मुख्याध्यापक विजय शिंत्रे, कुंभवडे गावचे सरपंच सूर्यकांत तावडे, शालेय समिती सदस्य श्रीमती प्रफुल्लता सुतार,श्रीमती एकता सावंत तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे चार्टर प्रेसिडेंट दीपक बेलवलकर, ॲड.दीपक अंधारी, ॲड. गुरु पावस्कर, महेंद्र मुरकर,लहू पिळणकर, श्री.वीरेंद्र नाचणे इत्यादी रोटरी मेंबर उपस्थित होते. वैद्यकीय तपासणी करीता डॉ.सुहास पावसकर, डॉ.चेतन म्हाडगूत,डॉ. प्रीती पावसकर, डॉ. प्राजक्ता तेली नाचणे हे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये सुमारे 80 विद्यार्थी व पालक यांची तपासणी करण्यात आली.
