बँक खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध

ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनचे आज धरणे आंदोलन

*⚡कणकवली ता.०३-:* ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांनी भारत सरकारने आणलेल्या बँक खाजगीकरण विधेयकाला आपला विरोध दर्शवला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य बँक कर्मचारी यांनी शासनाने आणलेल्या खाजगीकरणाच्या विधेयकामुळे बँकांमधील ठेवी सुरक्षित राहणार नाही शासनाचे निर्बंध उठले तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसेल तसेच खाजगीकणामुळे मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन जिल्हा सरचिटणीस संतोष रानडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य बँक कर्मचाऱ्यांनी 3 डिसेंबर रोजी कुडाळ ओरस,मालवण, कटा, कसाल, कणकवली येथून रत्नागिरी मार्गे मुंबईत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशन चे पदाधिकारी कणकवलीत पटवर्धन चौकात आले असता शिवसेनानेते संदेश पारकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकरआणि कणकवली व्यापारी असोसिएशन च्या वतीने शेखर गणपते, संतोष काकडे, राज्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार काका करंबेळकर या सर्वांनी आपण बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आल्याचे सांगत खासगीकरणाला विरोध दर्शविला आहे.यावेळी बँक ऑफ इंडिया स्टाफ अध्यक्ष विजय महाडिक ,निखिल साटम, संध्या मालवणकर , प्रणाली कडूलकर,बँक ऑफ महाराष्ट्राचे राज्यकुमार महाडिक,कविता भगात,केतन पालवे,मयूर उदान, राजरूप केळुसकर, शाहू पिंटू, सुनील दळवी,उज्वला धांनजी, पूर्वा मराठे,रक्षिता गवाणकर, सहभागी झाले होते 4 डिसेंबरला रोजी आझाद मैदानात या खाजगीकरणाच्या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलनही करणार असल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन जिल्हा सरचिटणीस संतोष रानडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page