*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील वाघेरी ,माळवाडी येथील मूळ रहिवासी व जानवली येथे सध्या वास्तव्यास असलेले तानाजी उर्फ नाना बाबू राणे( वय ५०) यांचे आकस्मिक निधन झाले. अटोमोबॉईल व्यवसायात कार्यरत असलेल्या तानाजी राणे यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,मुंबई परिसरात मोठा मित्रपरिवार होता. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजमनावर आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने कणकवलीसह वाघेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, विहिनी ,पुतण्या असा परिवार आहे.
वाघेरी -माळवाडी येथील तानाजी राणे यांचे निधन
