सद्गुरू श्री अवधुतानंद महाराजांची १५ वी पुण्यतिथी ५ डिसेंबरला होणार साजरी…

*⚡सावंतवाडी ता.०३-:* सद्गुरू श्री अवधूतानंद महाराज यांची १५ वी पुण्यतिथी उत्सव मार्गशी्ष शु.२ रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी अवधूत आश्रमात उत्साहात साजरा होणार असून, या उत्साहाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांनी केले आहे. यावेळी पहाटे ३:३० वाजता श्री लक्ष्मी नारायण व सद्गुरूंच्या पादुकांची पंचोपचार पूजा, पहाटे ५:०० वाजता श्री ची समाधीची काकड आरती, समाधीस अभ्यंगस्नान , रुद्राभिषेक व समाधी पूजन, सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहण, दुपारी १२:०० वाजता श्री ची आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता धूप, दीप, आरती व श्री ची पालखी असा भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी सेवा मंडळाने दिली आहे.

You cannot copy content of this page