समाजात वित्तीय साक्षरता व जागरूकता होणे आवश्यक – प्रा. विमल अशहर

*⚡मालवण ता.०३-:* आज भारतामध्ये ज्या गुंतवणूक कंपन्या कार्यरत आहेत, त्यातून अनेकवेळा लोकांची दिशाभूल करून फसवणूक केली जाते. म्हणूनच समाजात वित्तीय साक्षरता व जागरूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटंट प्रा. विमल अशहर यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात बोलताना केले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘वित्तीय साक्षरता आणि जागरुकता” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठातर्फे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा. विमल अशहर ( सी. ए.), सुमंत मोरे (समन्वयक) व मनोज भट्ट यांनी मार्गदर्शन केले. यावेळ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास रावते यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. खोबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संविधान दिनानिमित प्रारंभी प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास रावते यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यांनी संविधानाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. संविधान दिनानिमित राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भांडवल बाजार विषयक जागरुकता या संदर्भात बोलताना प्रा. विमल अशहर यांनी गुंतवणुकीचे कोणते फायदे आहेत याविषयीची मार्गदर्शक तत्वे सांगितली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. बी. एच. चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कोरोना विषयक नियम पळून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापक, सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page