सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे रक्तदान-अवयवदान पत्रलेखन स्पर्धा

*⚡मालवण ता.०३-:* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या रक्तदान, देहदान,अवयवदान व रुग्णमित्र म्हणून जिल्हा व महाराष्ट्रभर जनजागृती चळवळ चालवणाऱ्या संस्थेमार्फत रक्तदान व अवयवदान या विषयावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विनाशुल्क असून शालेय व खुला अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मित्र किंवा मैत्रिणीला रक्तदानाचे महत्त्व सांगणारे पत्र, किंवा अवयवदानाचे महत्त्व सांगणारे पत्र अशा दोन विषयावर पत्र लिहून ते प्रकाश तेंडोलकर (अध्यक्ष- सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ), सिंधुसदन -१२५१ बांदा, सुळभाटले, सिंधुुदुर्ग या पत्त्यावर दि. २० डिसेंबर पर्यंत पाठवायचे आहे. ५ वी ते ७ वी, ८ वी १० वी गट असे शालेय गट तर खुला गट १८ वर्षेवरील आहे. शालेय गटाने आंतरदेशीय पत्रावर पत्र लिहायचे असून खुल्या गटाने आखीव कागद वापरावा. शालेय गटासाठी प्रथम क्र. ५०१ रु., द्वीतीय ३०१ रु., तृतीय २०१ रु. व तीन उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जातील. खुल्या गटासाठी प्रथम १५०१ रु., द्वितीय- १२५१रु., तृतीय, ११११रु. व उत्तेजनार्थ ३ बक्षीसे देण्यात येतील. अधिक माहीतीसाठी 7721851304 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page