त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी
*⚡कणकवली ता.०२-:* ऐन हिवाळ्यात पावसाच्या मोसमाप्रमाणे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा व सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथेही काल सायंकाळ पासून ते आजही होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे .
नांदगाव ओटव फाटा रस्त्यावरुन नांदगाव मधलीवाडी येथील बाबा गगनग्रास यांच्या पर्यंत जाणा-या डांबरीकरण रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले आहे.
हे भगदाड वहाळातील पाणी पलीकडे वाहण्यासाठी पाईप घातले आहे तिथेच भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.त्या भगदाड मध्ये माडाचे जावळ पूर्ण पणे जात असून पूर्ण आजूबाजूलाही रस्ता कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्ता व मोरीचे काम माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले होते. व बराच कालावधी लोटला आहे.तर पाणी सुध्दा मोठ्या प्रमाणावर येते यामुळे सदर बांधकाम पूर्ण जिर्ण झाले आहे. तरी तेथील असलेले असंख्य नागरिक यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी .व पुढील नव्याने बांधण्यासाठी पाईप न टाकता आर.सी.सी वहाळ बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
