सावंतवाडी ता.०२-:भटवाडी येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नंबर 6 काल 1 डिसेंबर रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. यावेळी शाळेतील मुलांना मास्क, खाऊ व खेळणी वाटून नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते मुलांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिषा राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, उपाध्यक्ष प्राप्ती राणे, मुख्याध्यापिका सायली लांबर, गीता सुतार, श्रीमती केरकर, सौ डांगी, सौ साळुंके, श्रीमती चव्हाण इत्यादी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या उपस्थितीत शाळा नंबर ६ मधील मुलांचे स्वागत
