वाहतूकीचा झाला खोळंबा
*⚡कणकवली ता.०२-:* फोंडाघाटातील मोठ्या तीव्र वळणावर अॅक्सल तुटल्याने रस्त्या लगतच्या संरक्षक पॅरापिट वर कोल्हापूरकडे जाणारा लेलँड मागे येऊन जोरात टेकल्याने मोठा होणारा अपघात टळला. त्याच वेळी कोल्हापूरकडे जाणारा ट्रेलर साईड घेताना गटारात रुतून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
काल रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पाऊस-वारा यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. पीडब्ल्यूडीचे कर्मचारी शाहू शेळके तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी लगेच लगतचे हॉटेल मालक पवन भालेकर यांच्या खाजगी जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात ट्रेलर बाजूला करण्यात यश मिळवले. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली. याच दरम्यान आरटीओ ऑफिसचे जांंभार्डे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य जोमाने सुरू करून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले.
