सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहराचा सिटी बर्ड म्हणून ओळख प्राप्त असणारा भारद्वाज पक्षी आज विठ्ठल मंदिर येथे जख्मी अवस्थेत दिनेश सावंत यांना दिसून आला होता. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना त्याची कल्पना दिली. यावेळी रवी जाधव यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्याशी संपर्क साधत त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
जख्मी भारद्वाज पक्षाला जीवनदान…
