वायंगणी विकास सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक २४ डिसेंबर रोजी…

मालवण (प्रतिनिधी) वायंगणी विकास सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि. २४ डिसेंबर रोजी होणार आहे. चिंदर येथील श्री रामेश्वर विकास सहकारी संस्थेप्रमाणे वायंगणी सोसायटीमध्येही भाजप विरुद्ध शिवसेनाप्रणित पॅनेलमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या संस्थेत एकूण १३ जागा असून त्यापैकी दोन जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधील उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. उर्वरीत ११ जागांसाठी २५ नामनिर्देशने दाखल करण्यात आली आहेत. अश्विनी गोलतकर, स्नेहा गोलतकर, संतोष वायंगणकर, गणपत शेलटकर, सत्यवान सावंत, विलास सावंत, गणेश धुळे, राजेंद्र सावंत, दिलीप पुजारे, वासुदेव पाटील, दशरथ पाटील, अनिल बांदेकर, अनिल महाजन, उदय दुखंडे, गोविंद दुखंडे, भगवान सुर्वे, सदानंद राणे, हर्षद पाटील, अर्चना आंबेरकर, लतिका वायंगणकर, स्मिता सावंत, स्नेहा गोलतकर, प्रवीण पाटील, प्रतापसिंह सावंत, विजय सावंत आदी २७ उमेदवार विविध प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे प्रमुख उदय दुखंडे तर भाजप पुरस्कृत पॅनेलचे प्रमुख गणेश धुळे आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधील वैभव जोशी यांचा भटक्या विमुक्तमधून तर संतोष कदम यांचा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे.

You cannot copy content of this page