बांदीवडे गावाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा – सतीश प्रभू

*⚡मालवण ता.३०-:* बांदीवडे गावाला गेले अनेक महिने कायमस्वरूपी तलाठी नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महसूल खात्याच्या नाकर्तेपणामुळे बांदीवडे गावाला तलाठी मिळालेला नाही असा आरोप बांदीवडे गावचे माजी सरपंच सतीश प्रभू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. बांदीवडे गावात तलाठी कार्यालय बंद, तर अतिरिक्त पदभार दिलेले तलाठी जाग्यावर नाही अशी दयनीय स्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांना विविध कागदपत्रे, दाखले व कायदेशीर कामांसाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बांदीवडे गावाला लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी सतीश प्रभू यांनी केली आहे.

You cannot copy content of this page